आज सगळीकडे 2/12 चे मेसेज फिरताना दिसताहेत... जिंदगी ना मिलेगी दोबारा....
धार्मिक मनुष्य असो की चार्वाकवादी, एक सत्य दोघांनाही मान्य आहे की जिंदगी ना मिलेगी दोबारा...
फक्त इथून पुढे विचारसरणीचा फरक होतो आणि म्हणून त्या जिंदगीच्या विनियोगाचा!!
धार्मिकाला या एकदाच मिळालेल्या आयुष्यात भगवंत आपलासा करावा ही ओढ असते....
तर भौतिकतावाद्याला या जगात जे जे काही बरं-वाईट आहे ते किमान एकदा तरी अनुभवायची अनिवार ओढ असते...
शेवटी आयुष्य दोघांचंही संपणार हे निश्चित!!
कापूर देवाला आरती ओवाळताना जाळला तरी संपणार; न जाळता तसाच ठेवला तरी उडून जाणार आणि संपणार...
सदुपयोग कोणाचा झाला हा विचार ज्याचा त्याला लखलाभ!!!
सहज सुचलं म्हणून!!!
सगळ्यांनी जगून घ्या... जिंदगी न मिलेगी दोबारा!!
No comments:
Post a Comment